Loading...

 
Menu

मुंबई : महाराष्ट्रातील ‘या’ 22 गावांत कडक लॉकडाऊन

अहमदनगर जिल्ह्यातील 22 गावांत 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी येथील परिस्थितीची दखल घेतल कठोर उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 22 गावांत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोबतच शंभर टक्के चाचण्या तसंच बाहेरुन येणा-यांचं गावातील शाळेत 7 दिवसांचं विलगीकरण करण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळात गावांत फक्त औषध दुकाने भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगी शिवाय घेता येणार नाही. तसंच विनामास्क फिरणारे, चौकात पारावर विनाकारण बसणारे, फिरणारे यांचे फोटो काढुन त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्या

^