Loading...
शनिवार, 12 जून 2021, 09:44 pm( 4 वर्षे ago)
या भेटीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधात इतर पक्षांनी एकत्र येण्यासाठी रणनीती आखण्यासाठी ही बैठक झाली असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजप विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी ही बैठक झाली असल्याचं बोललं जात असताना यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, कोणी कोणाला भेटावं यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र कोणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केली तरी 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल यात शंका नाही असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किसोर यांच्याकडे देण्यात आलेली नाहीये. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट व्हावी अशी इच्छा शरद पवारांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जाता आले नाही असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.