Loading...

 
Menu

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी कोकण दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरा निश्चित करण्यात आला आहे. तौक्ते चक्रीवादळाने समुद्रकिनारी भागात धुमाकूळ घातला होता. कोकणात अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आता नेत्यांनी भाऊ गर्दी केली आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा कोकणातील नुकसानग्रस्त भागाची शुक्रवारी पाहणी करणार आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरा निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी चक्रिवादळग्रस्तं सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा पाहणी दौरा करणार आहे.आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यात कोणकोणत्या भागात किती नुकसान झाले आहे. याची चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काय मदत जाहीर करायची याबद्दलही चर्चा झाली. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश आधीच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. आता खुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे.

ताज्या बातम्या

^