मुंबई:मोठी बातमी, कॅबिनेट बैठकीत अजितदादा संतापले, काँग्रेस मंत्र्याच्या भूमिकेवर नाराज!
बुधवार, 19 मे 2021, 09:54 pm( 4 वर्षे ago)
कॅबिनेट बैठकीतही आज यावर चर्चा न करता अजित पवार यांनी नाराजी अप्रत्यक्ष व्यक्त केल्याचं समजते. पदोन्नतीत आरक्षण जीआर (Promotion reservation GR) वरून पुन्हा एकदा ऊर्जा मंत्री नितीन राऊत विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार मतभेद समोर येत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या आज कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीतच नितीन राऊत यांनी पदोन्नती आरक्षणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदोन्नतीत आरक्षणाला स्थगिती देण्याचा जीआर 7 मे रोजी काढला होता. त्याविरोधात या विषयातील उपसमितीत आज चर्चा झाली. या बैठकीत पदोन्नतील आरक्षण जीआरला तूर्तास स्थगिती दिली जावे, अंमलबजावणी करू नये अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. मात्र, बैठकीत असं काहीच ठरले नसताना नितीन राऊत यांनी भूमिका मांडल्याने अजित पवार नाराज झाले
ताज्या बातम्या