मुंबई :राज्यात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे इतके डोस शिल्लक, आरोग्यमंत्र्यांची माहिती
बुधवार, 19 मे 2021, 09:49 pm( 4 वर्षे ago)
आम्ही टेस्टींग कमी केलेल्या नाही. महाराष्ट्रात दहा लाख लोकांमागे अडीच लाख टेस्ट होत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे खूप मोठ्या प्रमाणावर संक्रमीत रुग्ण सापडले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यात कोरोना केसेस कमी होऊ लागल्या आहेत. त्यात आज राज्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर गेला आहे. महाराष्ट्राचा अँक्टिव्ह केसेसचा आकडा ७ लाखावरुन आता ४ लाखांवर आलाय आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र ग्रोथ रेटमध्ये 34 व्या क्रमांकावर आहे.
त्याच बरोबर टोपे यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही टेस्टींग कमी केलेल्या नाही. महाराष्ट्रात दहा लाख लोकांमागे अडीच लाख टेस्ट होत आहेत. आतापर्यंत 2 कोटी 2 लाख 31 हजार डोस दिले गेले आहेत.
लसींचे वाटप कसे?
कोविशिल्डचे 3 लाख आणि कोव्हॅक्सिनचे 2 लाख डोस शिल्लक आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या लसी या दुसऱ्या डोस घेणाऱ्यांसाठीच वापरणार असल्याचे, राज्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहोत. ते पुढे असे ही म्हणाले की, दुसरा डोस देऊन झाला की, आम्ही 45 वर्षांवरील लोकांना पहिला डोस देण्याचे कार्य सुरु करु.
ताज्या बातम्या