Loading...

 
Menu

महाराष्ट्र: राज्यात रुग्णवाढीला ब्रेक मात्र मृत्यूदर चिंता वाढवणारा; आज तब्बल 974 मृत्यू.

राज्यातील रुग्णांच्या बरं होण्याचं प्रमाण पाहता ती टक्केवारी 89.74 एवढी झाली आहे. म्हणजे राज्याचा रिकव्हरीरेट दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं राज्याच्या दृष्टीनं ही दिलासादायक बाब आहे.कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णसंख्येचा विचार करता रविवारीदेखिल राज्यासाठी काहीशी दिलासादायक अशीच आकडेवारी समोर आल्याचं पाहायला मिळालं. मात्र मृतांच्या आकडेवारीची चिंता (Corona Death Rate) अजूनही कायम आहे.
%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%8d

रविवारीदेखिल राज्यातील मृतांचा आकडा हा 974 होता.तर मृत्यूदरही वाढलेला पाहायला मिळाला.रविवारी राज्यामध्ये नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 389 एवढी होती. तर कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ही 59 हजार 318 एवढी होती. राज्यातील रुग्णांच्या बरं होण्याचं प्रमाण पाहता ती टक्केवारी 89.74 एवढी झाली आहे. म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं राज्याच्या दृष्टीनं ही दिलासादायक बाब आहे.मात्र राज्याचा रिकव्हरीरेट वाढत असल्यानं दिलासा मिळाला असला तरी डेथ रेट म्हणजेच मृत्यूदर हा चिंता वाढवत असल्याचं पाहायला मिळतंय. रविवारी राज्यात कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा 974 होता. शनिवारच्या तुलनेत हा आकडा वाढलेला होता. तर मृत्यू दर देखिल वाढलेला म्हणजे 1.52 टक्के एवढा पाहायला मिळाला. त्यामुळं रुग्णसंख्या आटोक्यात येत असतानाच मृत्यू दर कमी होत नसल्यानं चिंता वाढत आहेत. मृत्यूदरात झालेली वाढ ही प्रत्यक्षात 0.01 टक्का एवढीच आहे. मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येप्रमाणं कमी न होता ही वाढ होणं हेच अधिक चिंताजनक आहे.राज्यातील रविवारी अ‍ॅक्टीव्ह असलेल्या रुग्णांचा आकडा 4 लाख 68 हजार 109 आहे. तर एकूण रुग्णसंख्या आतापर्यंत 54 लाखांच्या घरात पोहोचत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच कोरोनाची रुग्णसंख्या पाहता आकडे दिवसेंदिवस कमी होत असले, तरी कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूंवर आळा घालण्यात सरकारला यश येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारला विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. कोरोना रुगणांची संख्या कमी होत असतानाच त्याच पटीनं मृत्यूचा आकडाही कमी होणं गरजेचं आहे.

ताज्या बातम्या

^