Loading...
रविवार, 16 मे 2021, 08:40 pm( 4 वर्षे ago)
आज त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. 23 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असणाऱ्या काँग्रेस खासदार राजीव सातव यांची जगण्याशी झुंज अपयशी ठरली आहे.काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे. आपला एक चांगला मित्र आणि राजकीय नेता गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.