Loading...
रविवार, 16 मे 2021, 08:32 pm( 4 वर्षे ago)
तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव हा मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये देखील पाहायला मिळू शकतो. रायगडमध्ये यामुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण तालुक्यातील 1600 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या नागरिकांना शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.जिल्ह्यात पहाटे 5 वाजता जोरदार पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे.