नागपूर :उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबतही युती करु शकतात – चंद्रशेखर बावनकुळे
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022, 03:17 pm( 2 वर्षे ago)
"उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांची बैठक घेऊन त्यांच्यासोबतही युती करु शकतात," अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. आमचे सरकार मजबूत आहे. अजूनही 20 ते 25 आमदारांचं छुपं समर्थन आम्हाला आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये, असंही बावनकुळे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या ‘शिवशक्ती-भिमशक्ती’च्या नव्या राजकीय आघाडीची चर्चा रंगत आहेत. त्यातच मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही भविष्यातील राजकीय मैत्रीचे संकेत दिले. त्याबाबत नागपुरात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना
टोला लगावला आहे.
ताज्या बातम्या