Loading...

 
Menu

मुंबई : कोरोनातून बरे झालेल्यांना लसीचा का गरज नाही?, मोदींना अहवाल सादर

धक्कादायक बातमी. कोरोनातून बरे झालेल्यांना लसीची आवश्यकता नाही. धक्कादायक बातमी. कोरोनातून बरे झालेल्यांना लसीची आवश्यकता नसल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी आपला अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहवाल सादर केला आहे. हायरिस्क व्यक्तींनाच लस द्या, असे दिलेल्या अहवालात सल्ला देण्यात आला आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87

कोरोनातून बरे झालेल्यांना कोरोना लस घ्यायची गरज नाही असा अहवाल देशातल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. सर्व प्रौढांना लस देण्याच्या मोहिमेचा पुनर्विचार करा, असा सल्ला या अहवालातून सरकारला देण्यात आला आहे. सर्वांना लस देण्याऐवजी केवळ हायरिस्क असलेल्यांनाच लस द्या असा सल्ला यातून देण्यात आला आहे. अर्धवट लसीकरण किंवा मुदत संपल्यावर दुसरा डोस दिल्यामुळे कोरोना व्हायरसच्या म्युटंटचा प्रसार होण्याचा धोका आहे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या या समुहात एम्सचे डॉक्टर्स, राष्ट्रीय टास्कफोर्सचे सदस्य यांचाही समावेश आहे. तसेच कमी वयाचे प्रौढ आणि मुलांना लसीकरणाचा कोणताही फायदा नाही, असे या अहवालात म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक, व्याधी असलेले आणि लठ्ठ लोकांनाच धोका अधिक असल्याने त्यांचेच लसीकरण करावे, असा सल्ला या अहवालातून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

^