Loading...

 
Menu

राज्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यात सातत्याने घट, दिवसभरात 20,852 रुग्णांची मात

राज्यातील रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे.राज्यात महिन्यांपूर्वी कोरोनामुळे (Corona In Maharashtra) अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला. यामध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले. दरम्यान आता राज्यातील आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. राज्यातील रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 14 हजार 152 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. तर 20,852 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर 289 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Today June 4 2021 14 thousand 152 patients of Corona were found in Maharashtra) राज्यात एकूण रुग्ण किती? राज्यात 1 लाख 96 हजार 894 सक्रीय रुग्ण आहेत. म्हणजेच इतक्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 55 लाख 7 हजार 58 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सातत्याने रुग्णसंख्येत होत असलेली घट ही दिलासादायक बाब आहे.
%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d

ताज्या बातम्या

^