Loading...
शुक्रवार, 4 जून 2021, 11:01 pm( 4 वर्षे ago)
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने (serum institute of india) भारतात स्पुटनिक व्हीच्या उत्पादनाच्या परीक्षण परवान्यासाठीच्या परवानगी मागण्यासाठी डीसीजीआयकडे अर्ज केला होता. तसेच चाचणी परवानासाठीही मान्यता मिळावी, यासाठीही आवेदन केलं होतं.सीरममध्ये सध्या ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राजेनेका (Oxford-AstraZeneca) द्वारे बनवण्यात आलेल्या कोव्हीशील्ड लसीची निर्मिती केली जात आहे. जूनमध्ये कोव्हीशील्डचे 10 कोटी डोस सरकारला पुरवणार असल्याचं सीरम इंस्टीट्यूटने याआधीच महटलं होतं. नुकतेच सीरमच्या वतीने गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवण्यात आले होते. त्या पत्रामध्ये म्हटलं होतं की, “कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. यानंतरही आमचे कर्मचारी 24 तास काम करत आहे. कर्मचारी नोवाव्हॅक्स (Novavax) लसीची निर्मिती करत आहे. नोवाव्हॅक्स लसीच्या उत्पादनासाठी अजूनही अमेरिकाकडून परवानगी मिळालेली नाही”.