दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येतील का? असा प्रश्न आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांना विचारण्यात आला असता अत्यंत सूचकपणे त्यांनी उत्तर दिलं.महाराष्ट्राचं राजकारण हे ठाकरे घराण्याशिवाय कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. एकीकडे उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे आपल्या मनसे पक्षांसाठी खंबीरपणे लढा देत आहे. पण, दोन्ही ठाकरे कधी बंधू एकत्र येतील का? असा प्रश्न आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांना विचारण्यात आला असता अत्यंत सूचकपणे त्यांनी उत्तर दिलं. मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी दैनिक लोकसत्ताला विशेष मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये राज यांनी चौफेर फटकेबाजी करत प्रश्नांना उत्तर दिली. राज्यातील कोरोना परिस्थिती आणि राजकीय घडामोडींवर राज यांनी दिलखुलास उत्तर दिली. यावेळी राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर राज ठाकरे म्हणाले की, ‘परमेश्वरास ठाऊक, देवाला मानतो म्हणून आम्ही दोघांनी एकत्र कधी यावं यावर बोलू शकत नाही. आता या प्रश्नाचे उत्तर तरी माझ्याकडे नाही. इतर कुणाकडे असेल असं मलाही वाटत नाही. माझी मनापासून इच्छा आहे की, कोरोनातून समाज बाहेर आला पाहिजे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी होत राहतील’. सध्या राज्यातील राजकारण हे वेगळ्याच पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे कोण कोणत्या बिळातून बाहेर येईल हे माहिती नाही. महानगर पालिकाच्या निवडणुकांपर्यंत जी माझी वाटचाल असेल तीच पक्षाची भूमिका असणार आहे. हा मला डोळा मारतोय, तो मला पत्र पाठवतो, त्यावर आमची कोणतीही भूमिका नसणार आहे. ज्या वेळी निवडणुका लागू होतील तेव्हा काय निर्णय घ्यायचा ते बघू, असंही राज ठाकरे म्हणाले.