Loading...
बुधवार, 2 जून 2021, 10:17 pm( 4 वर्षे ago)
आशिष शेलार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केसा. ‘महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत कुकर्मातील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, मराठा समाजाच्या आरक्षणाचा कोल्ड ब्लडेड मर्डर केलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. मराठा समाजाच्या हिताचा खून ठाकरे सरकारने केला आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली. समाजा समाजामध्ये तेढ लावण्याचं काम इंग्रजांनी केलं ते ठाकरे सरकार करत आहे म्हणून इंग्रजांना चले जाव म्हणायची वेळ आली तसेच ठाकरे सरकारला चले जावं असा इशारा आम्ही देत आहोत, असे आशिष शेलार म्हणाले.आशिष शेलार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केसा. ‘महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत कुकर्मातील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, मराठा समाजाच्या आरक्षणाचा कोल्ड ब्लडेड मर्डर केलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. मराठा समाजाच्या हिताचा खून ठाकरे सरकारने केला आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली. समाजा समाजामध्ये तेढ लावण्याचं काम इंग्रजांनी केलं ते ठाकरे सरकार करत आहे म्हणून इंग्रजांना चले जाव म्हणायची वेळ आली तसेच ठाकरे सरकारला चले जावं असा इशारा आम्ही देत आहोत, असे आशिष शेलार म्हणाले.आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण देण्याचा आदेश राज्य सरकारने काढला. हे आरक्षण मोदी सरकारने दिले होते. यात तुमचे कर्तृत्व काय? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला. मराठा समाजाच्या मोर्चा टिंगल टवाळी करण्याचे काम शिवसेनेने केले. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागण्याची हिंमत सुद्धा शिवसेनेने केली, त्यामुळे तुम्ही भावनाशून्य होतात. गायकवाड आयोगाची मांडणी योग्य पद्धतीने केले नाही, तेव्हा कर्तृत्व हीन आहेत हे दिसून आले, अशी टीकाही त्यांनी केली.