Loading...
मंगळवार, 1 जून 2021, 09:31 pm( 4 वर्षे ago)
सध्या देशात 20 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे Black Fungusबाबत चिंता व्यक्त होत आहे.
26 राज्यात लोकांवर उपचार सुरु : ब्लॅक फंगसचा (Black Fungus) संसर्ग देशातील 26 राज्यात पोहोचला असून सध्या देशभरात सुमारे 20 हजार रुग्णांवर या आजारावर उपचार सुरु आहेत. आयसीएमआरच्या (ICMR) मते मधुमेहाच्या रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिसचा धोका जास्त असतो.देशात काळ्या बुरशीच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्या औषधाची मोठी कमतरता आहे आणि एकूण मागणीच्या दहा टक्के इतकेच इंजेक्शन्स उपलब्ध नाहीत. केंद्रीय रसायन व खते मंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनी सोमवारी माहिती दिली की केंद्र सरकारने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना अॅम्फोटेरिसिन-बीच्या अतिरिक्त 30100 कुपी वाटप केल्या आहेत. अॅम्फोटेरिसिन-बीचा उपयोग म्यूकरमायकोसिसच्या उपचारात केला जातो.