Loading...

 
Menu

दिल्ली : CBSE 12 वीच्या परीक्षा रद्द, राज्यातील HSC परीक्षेचा निर्णय टांगणीवर.

व्हिडियो कॉन्फ्रेंसिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली होती. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, रक्षा मंत्री राजनाथ सिंह, वित्त मंत्री निर्मला सितारामन तसंच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर देखील सहभागी होते. CBSE च्या बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. CBSE बारावी बोर्डाची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. CBSE 12वीच्या बोर्डाच्या परिक्षासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान राज्यातील HSC परीक्षेबाबतचा निर्णय बुधवारी घेण्यात येणार आहे.
%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-cbse-12-%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%b0

व्हिडियो कॉन्फ्रेंसिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली होती. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, रक्षा मंत्री राजनाथ सिंह, वित्त मंत्री निर्मला सितारामन तसंच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर देखील सहभागी होते. परीक्षा रद्द करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटही केलं आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “सरकारने CBSE बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. शिवाय हा निर्णय आपल्या तरूणाईच्या सुरक्षेसोबत त्यांच्या भविष्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.”

ताज्या बातम्या

^