Loading...
बुधवार, 19 मे 2021, 10:06 pm( 4 वर्षे ago)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरा निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी चक्रिवादळग्रस्तं सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा पाहणी दौरा करणार आहे.आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यात कोणकोणत्या भागात किती नुकसान झाले आहे. याची चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काय मदत जाहीर करायची याबद्दलही चर्चा झाली. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश आधीच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. आता खुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे.