Loading...
रविवार, 16 मे 2021, 09:08 pm( 4 वर्षे ago)
यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) देशातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. UIDAI ने, केवळ आधार कार्ड नसल्याने कोणत्याही नागरिकाला उपचार नाकारता येणार नाही. तसंच लसीकरणासाठीही (Corona Vaccination) आधार कार्ड अनिवार्य नसल्याचं, स्पष्ट करण्यात आलं आहे.UIDAI ने स्पष्ट केलं, की कोरोना वॅक्सिन घेण्यासाठी, औषधं घेण्यासाठी, तसंच रुग्णालयात भरती होण्यासाठी आधार कार्ड असण्याची अनिवार्यता संपवण्यात आली आहे. त्यामुळे इलाज करण्यासाठी, उपचार घेण्यासाठी केवळ आधार कार्ड नाही, म्हणून कोणीही नकार देऊ शकत नाही. आवश्यक सेवा मिळवण्यासाठी आता आधार अनिवार्य असणार नाही