Loading...

 
Menu

मुंबई :कोरोना साथीत मोठे संकट; या राज्याला बसणार चक्रीवादळाचा तडाखा, सहा राज्यांत जोरदार पाऊस

देशात काही राज्यांमध्ये नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर गुजरात राज्यात जोरदार वादळासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकण्याची जास्त शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आधीच कोरोना विषाणूचे संकट  (Coronavirus Pandemic) आणि आता हे चक्रीवादळाचे संकट गुजरातवर घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार 17 आणि 18 मे रोजी जोरदार चक्रीवादळ समुद्र किनारी धडकणार आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%87-%e0%a4%b8

आधीच कोरोनाव्हायरस महामारीचा सामना गुजरातला करावा लागत आहे. त्यातच आता गुजरातमध्ये चक्रीवादळाचा धोका आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. हवामान खात्याने 17 आणि 18 मे रोजी पश्चिम किनाऱ्यावरुन चक्री वादळ वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. तथापि, हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराची किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे. असे असले तरी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यालाही याची जोरदार धडक बसू शकते. चक्रीवादळाला Tauktae असे नाव देण्यात आले. 2021मधील हे पहिले चक्रीवादळ असेल आणि त्याला ‘Tauktae’ असे नाव देण्यात आले. यावेळी वादळाचे नाव म्यानमारमधून देण्यात आले आहे, म्हणजे, जोरात आवाज देणारी पाल. गुजरातशिवाय गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि लक्षद्वीप यांना किनारपट्टी भागात जोरादर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यासह हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार लक्षद्वीप आणि मालदीवच्या भागात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहतील. याशिवाय केरळ, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातील लोकांना वादळी वाऱ्यासह पावसाचा सामना करावा लागणार आहे.

ताज्या बातम्या

^